(२७ सप्टेंबर १९९९)
'स्वप्न... एक संवेदना, एक हर्षवेदना.
एक आकांक्षा, जिजीविषा.
स्वप्न... एक सोनेरी आभास..
कदाचित वास्तवाचं(च) प्रतिरुप..
स्वप्न...
लखलखतं लावण्य आणि तळपती धार, म्हणजे स्वप्न.
अविजीत आशा आणि अमर्त्य इच्छा म्हणजे स्वप्न.
एक भावना म्हणजे स्वप्न, एक विचार म्हणजे स्वप्न...
... एक वळवाचा पाऊस.
इच्छेला क्रिया अन् प्रेमाला प्रिया भेटावी तसं...स्वप्न.
अपेक्षेला आशेचा असावा तसा जीवनासाठी स्वप्नाचा अर्थ.
आभासाला मितीची असावी तशी आयुष्याला स्वप्नाची नेणीव...
खरंच, हे 'स्वप्न' म्हणजे केवळ 'आभास'च?
असेलही...
किंवा असावाच!
कारण, तसं नसतं तर.. तुझ्या 'नसण्या'च अर्थ लावण्यासाठी मला दुसरा पर्य़ाय होता कुठे?...