२ सप्टेंबर १९९९
एक प्रवास संपलाय,
एक लढाई हारलोय;
न लढताच.
तू... गेलीस.
स्वप्नांचे दवबिंदू आयुष्याच्या पानावरून ओघळून गेले.
तू गेलीस.
मी, रिक्तह्स्त.
आकांक्षांचे निखारे जळून, विझून गेलेत.
रक्षेचा स्वामी मी,
रिक्तह्स्तच.
...नाही, पण
स्वप्नं नसली तरी,
त्यांची राख थोडी शिल्लक आहे
आणि
पुन्हा फिनिक्सची जिद्दही आहे.
कोसळणाऱ्याच्या प्रांतातला मी नाही,
देवदासाचा पिंड माझा नाही.
मी...
पुन्हा उभा राहीनही,
पुन्हा स्वप्नं पाहीनही.. पुन्हा लढण्यासाठी!
पण...
तुला
विसरून???
एक प्रवास संपलाय,
एक लढाई हारलोय;
न लढताच.
तू... गेलीस.
स्वप्नांचे दवबिंदू आयुष्याच्या पानावरून ओघळून गेले.
तू गेलीस.
मी, रिक्तह्स्त.
आकांक्षांचे निखारे जळून, विझून गेलेत.
रक्षेचा स्वामी मी,
रिक्तह्स्तच.
...नाही, पण
स्वप्नं नसली तरी,
त्यांची राख थोडी शिल्लक आहे
आणि
पुन्हा फिनिक्सची जिद्दही आहे.
कोसळणाऱ्याच्या प्रांतातला मी नाही,
देवदासाचा पिंड माझा नाही.
मी...
पुन्हा उभा राहीनही,
पुन्हा स्वप्नं पाहीनही.. पुन्हा लढण्यासाठी!
पण...
तुला
विसरून???
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा