सावर … आता नाहीये तिथे
काय झालं असेल तिचं ?कुणी घाव घालून उखडून टाकली असेल का?
एखाद्या वादळा समोर हतबल झाली असेल… तुफानाच्या तुफानपणावर जीव ओवाळून टाकला असेल तिने…
पण मग मला काय त्याचं ?
इतक्या वर्षांनंतर ती तिथे असावी तरी का?
मुळात मीच तर नव्हतो इथे… मलाच यायचं नव्हतं ना … मग??
तरीही …
मी असेन - नसेन पण ती सावर तिथे नाही हे कसं मान्य करावं?
आता तो आत्ममग्न डौल नाही
नाही तो रक्ताला आव्हान देणारा रंग, एकटेपणाचा नजरबंद करणारा साज.
पण ती सावर खरंच नाहीये का?
म्हणजे ती तिथे नाही म्हणून कुठेही नाही असं नक्कीच नाहीये
ती आहे
माझ्या मनात … माझ्या गाण्यात … कदाचित
किंवा नक्कीच !
बहुतेक, ही माझ्या मनातली सावर जास्त खरी असेल
किंवा आत्ता माझ्यामधून ती सावरच बोलतेय … असंही असेल कदाचित !
असेल ना?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा