...From "The Foundation Series" Does my lack of knowledge of their absence show they are all present? - Hari SeldonI don't want to believe it just because I want to believe it. - Dors VanebiliViolence is the last refuge of an incompetent.Never let you sense of morals prevent you from doing what is right. - Hobbar MallowAfter all, the essential point in running a risk is that the returns justify it.We must know not only how to win, but whom to defeat.You are careful not to indentify the emotion, as far as you can manage to fail to identify it.The closer to te truth, the better the lie, and the truth itself, when it can be used, is the best lie.It pays to be obvious, especially if you have a reputation for subtlety. - R. Daneel OlivawSuperstition always directs action in the absence of knowldege.It is astonishing that a collection of statements that are individually true can be used, in combination, to yield an effect that the truth should not.

बुधवार, ४ एप्रिल, २००७

नकळत

१४ जुलै १९९९

मीही लिहितो तसं...
नाही, म्हणजे तसा प्रतिभा वगैरे गोष्टींशी संबंध नाही;
पण तरीही, मी लिहितो.

"ती"ही वाचते कधी कधी.
कधी कौतुक; कधी टीका; कधी फक्त हसणं तर कधी...काहीच नाही.
तिच्या पिंगट डोळ्यातली ती आर्द्र भावना; कवितेतला विरह वाचून तिचं ते हेलावून जाणं,...सुरेखच.

"किती छान लिहितोस तू! सुरेखच. हे सगळं तुला जमतं तरी कसं? म्हणजे तो विरह, ती जीवघेणी वेदना, ती धुंदी, ते असीम प्रेम, समर्पीतता..." वगैरे वगैरे. आणखीही बरंच काही..
मग तिचे ते भावविभोर डोळे बोलून जातात, अन् मला मात्र उगाचच तिच्या डोळ्यातली काजळाची रेघ फिसकटल्यासारखी वाटते.

माझ्या कवितेत "ती"ही येऊ लागली होती अधुनमधुन.पण तीच होती का ती? असावी.

कवितेतली ती, माझी महत्त्वाकांक्षा होती अन् वास्तवातली ही... बहुधा माझं स्वप्न असावी.कळत नकळत तिचं, माझ्या कवितेतलं अस्तित्व ठळक होत चाललं होतं!

ती कातर संध्याकाळ, ते कौतुक, हसणं, मनमोकळी दाद, पिंगट डोळ्यांच्या कडेशी किंचित फिसकटलेली ती काजळाची रेघ... एक घट्ट वीण.


अशाच एका संध्याकाळी ती आली, "तो"ही सोबत.
"हा_____ , आम्ही दोघं..." तो आरक्त चेहरा, ते भावस्पर्शी डोळे.
"तुझ्याच प्रेमकवितांनी जादू केली होती ना.." एक अवखळ अदा.
तिची भिरभिरती नजर, मी स्तब्ध, तो निःशब्द.

ते निरोपाचे, आणि त्याहूनही आभाराचे शब्द, छातीत घट्ट रुतून बसलेले.

"ही माझी आठवण," इति मी; माझी प्रिय कवितांची वही तिच्या हातात ठेवताना.

ती गेली, त्याचा हातात हात गुंफूंन.
त्या शब्दांचा अर्थ आता नसेनसेत भिनू लागला होता. भयाण वास्तवाचा करालपणा प्रच्छन्नपणे जाणवत होता.

ती गेली, ती गेलीय..
आता.. पुन्हा "कविता" शक्य नाही. जाताना ती माझी वहीच नव्हे तर; तर माझं "लिहिणं"च घेऊन गेली होती! माझी कविता घेऊन गेली होती!!

कधीकाळी वाटलं होतं, कुणी नसलं तरी हे शब्द, माझी कविता शेवटपर्यंत साथ करेल; पण तीही अशी फितूर झालेली. माझ्याही नकळत. ज्यांच्यावर मी जीवापाड प्रेम केलं ते शब्दही मला असे परके होतील हे कधी स्वप्नातही जाणवलं नव्हतं. पण हेच वास्तव होतं.., ज्वलंत.

कागदावरचे हे शब्द असे निस्तेज, बेरंगी झाले होते, वठलेल्या निष्पर्ण सावरीच्या तळाशी विसावलेल्या पाचोळ्यासारखे.

हे शब्द, ज्यांना मी हळूवारपणे जपलं, तेच असे अनोळखी कधी झाले कळलंच नाही..
मी निःशब्द केव्हा झालो, कळलंच नाही..
प्रेमभंगाच्या कविता लिहिता लिहिता,मी देवदास कधी झालो कळलंच नाही..
खरंच..
कळलंच नाही..

२ टिप्पण्या:

Pawankumar Nathani म्हणाले...

असेच लिहीत रहा. नकळतच ती येईल, फ़क्त शुधीवर रहा म्हणजे ठीक.

Sudeep Mirza म्हणाले...

ती केव्हाच येऊन गेली...
शुद्धीवर रहायला वेळ आहेच कुणाला...

अगर तू इत्त्एफाक़न मिल भी जाए.
तेरी फुऱक़त के सदमें कम ना होंगे.